Breaking News

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आणा : आ. शिंदे; संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ औंध येथे सभा उत्साहातऔंध / प्रतिनिधी : केंद्रातील हुकुमशाही प्रवूत्तीचे भाजपा सरकार उलथून टाकून समविचारी, धर्मनिरपेक्ष विचारांचे विकासाचा दूष्टीकोन समोर ठेवणारे कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे सरकार सत्तेवर आणा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ.शशिकांत शिंदे यांनी केले.

माढा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ औंध येथे आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी संजयमामा शिंदे,माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, सुनील माने, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड,संदिप मांडवे, सुरेंद्र गुदगे,हणमंत शिंदे,प्रा.बंडा गोडसे, राजेंद्र माने,प्रा.कविता म्हेत्रे, प्रा.एस.पी.देशमुख,दीपक देशमुख,सरपंच नंदिनी इंगळे,सोनाली मिठारी उपसरपंच सचिन शिंदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आ.शिंदे पुढे म्हणाले, मागील पाच वर्षात या सरकारने भूलथापा देऊन जनतेला झुलवत ठेवले विकासाचे गाजर दाखवून ठराविक दोन चार बड्या उद्योगपतींचे भले केले. जीएसटी, नोटबंदी असे घातक निर्णय घेऊन अर्थव्यवस्था डबघाईला आणली असून भुलथापा देणार्‍या सरकारला उलथून टाकण्याची हीच योग्य वेळ असून शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिकांचे जीवन सुखी करण्यासाठी आमच्या उमेदवारांना एक संधी द्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संजयमामा शिंदे म्हणाले की, माढा,खटाव,माण व अन्य तीनही दुष्काळी तालुक्यात विकासकामे खेचून आणण्यासाठी तसेच शेती पाणी प्रश्र्न सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी जनतेने आपल्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले.

रासपचे वडूज येथील आण्णासाहेब काकडे यांनी रासपला राम राम करून आ.शशिकांत शिंदे व प्रमुखांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपने आमदारांच्या खिशात काय घातलंय:-कायम भाजपच्या विरोधात असणार्‍या माण-खटावच्या आमदारांनी अचानक भूमिका बदलल्याचे समजत आहे,लपून-छपून त्यांचा भाजपचा प्रचार सुरू आहे नेमके भाजपने त्यांच्या खिशात काय घातलंय याचा शोध माण-खटावच्या जनतेने करण्याचे आवाहन जि.प.सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले.