Breaking News

आयटीआयच्या ११४ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड


प्रवरानगर /प्रतिनिधी: लोणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (आयटीआय) शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी बारामती येथील पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने आयोजित केलेल्या परिसर मुलाखतीमध्ये सुमारे ११४ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली. अशी माहिती प्राचार्य जयंत धर्माधिकारी यांनी दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम वर्षातील परिक्षा झाल्यानंतर लगेच जून महिन्यामध्ये रुजू करण्यात येणार आहे. यामध्ये लोणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे(आयटीआय )मधील शेवटच्या वर्षातील डिझेल मेकॅनिकल विभागातील २० विदयार्थी , वेल्डर विभागातील १८ विदयार्थी, पेंटिंग विभागातील १२ विदयार्थी, मोटरमेकॅनिकल १८ विदयार्थी, आणि फिटर विभागातील १२ अशा एकूण ८० विद्यार्थ्यांचा समावेश असून, राहुरी फॅक्टरी येथील लक्ष्मीनारायण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ३० आणि राहता येथील श्री शिर्डी साई रूरल इन्स्टिट्युट च्या ४ अश्या एकून ११४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पियाजिओ कंपनीचे एच आर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर राकेश लुनावात आणि प्रोडक्शन ऑफिसर शेवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मुलाखती घेण्यात आल्या.