Breaking News

अल्बममध्ये नाचणार्‍यांनी मला शिकवू नये


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यावर महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचा धसका भाजपने चांगलाच घेतल्यामुळे भाजपच्या सभामध्ये राज ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडतांना मुख्यमंत्री दिसत नाही. राज ठाकरे यांनी ‘द रिव्हर अँथम’ या अल्बममध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका साकारली होती त्याचा आधार घेत अल्बममध्ये नाचणार्‍यांनी मला शिकवू नये, असा टोला लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या प्रत्येक प्रचारसभेत राज ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत. ‘रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसर्‍याच्या लग्नात नाचतय खुळं’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली होती. त्यावर मागील काही दिवसांपासून मनसे व भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरून खडाजंगी सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करताना ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ असेही म्हणून राज यांचा समाचार घेतला होता.

 राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मतदान करा असं आवाहन राज ठाकरे हे त्यांच्या सभांमधून करत आहेत. राज ठाकरेंनी भाजपाला केलेल्या टार्गेटमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला धारेवर धरलं आहे. मागच्या वेळी देखील राज ठाकरे यांची स्क्रीप्ट बारामतीहून येते, राज हे बारामतीचे पोपट आहेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता तर यावर राज यांनीही मुख्यमंत्र्यांवर हवा गेलेला फुगा अशारितीने टीका केली होती. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मतदान करा, असे आवाहन राज ठाकरे हे त्यांच्या सभांमधून करत आहेत. राज ठाकरेंनी भाजपला केलेल्या टार्गेटमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला धारेवर धरलं आहे. मागच्या वेळीदेखील ‘राज ठाकरे यांची स्क्रीप्ट बारामतीहून येते, राज हे बारामतीचे पोपट आहेत’ असाही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता, यावर राज यांनीही मुख्यमंत्र्यांवर ‘हवा गेलेला फुगा’ अशारितीने टीका केली होती. त्यानंतर मनसे पहिल्यांदा ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ होती त्यानंतर ‘मतदार नसलेली सेना’ झाली आणि आता ‘उमेदवार नसलेली सेना’ म्हणजे ‘उनसे’ झाली आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला लगावला. यावर मनसेकडूनही बीजेपी म्हणजे ‘भारतीय जुमला पार्टी’, असे प्रत्युत्तर करण्यात आले.