Breaking News

दातेवाडी येथे आज विष्णुदेवाचा रथोत्सव


कातरखटाव / प्रतिनिधी : हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या दातेवाडी (ता. खटाव ) येथील ग्राम दैवत विष्णूदेव आणि लालशहाबाज कलंदर व अल्लाउद्दीनशा बाबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती संयोजकांनी दिली.

रविवारी ( दि. 7) सकाळी शंकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 3 वाजता जय जय महाकाल रमेशजी कदम महाराज यांचे हस्ते रथपूजन करून विष्णूदेवाची रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. रथासमोर जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझीमचा कार्यक्रम होणार आहे. तर मिरवणूक संपल्यावर सायंकाळी सात वाजता पीराचा संदल व चादरशरीफ होवून जुलूस काढण्यात येणार आहे. रात्री 9 वाजता भारूडी भजन, सोमवारी (दि.8) सकाळी 11 वाजता श्र्वान शर्यती यात अंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकवणार्या श्र्वान मालकास 12 हजार रूपये व चषक देण्यात येणार आहे.