Breaking News

उर्दू शाळेत डॉ. आंबेडकरांना अभिवादन


श्रीरामपूर/प्रतिनिधी: राहता तालुक्यातील टिळकनगर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मुळा प्रवराचे जेष्ठ संचालक अंबादास पाटील ढोकचौळे, सूभाष गायकवाड, इजाजभाई शेख, बाळासाहेब ढोकचौळे, राहिबाई बागूल, प्रभागातील ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या परवीन जाकीर शेख, सविता सिध्दार्थ बागुल, रजिया शकील पठाण, मंगल गणेश आवारे, शिक्षक खान शिरीन मुखतार, खान नसीम नादीर, तांबोळी अफसाना मन्सूर, सबिना सत्तर सय्यद सह शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अफसाना शेख व उपाध्यक्ष इरफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.