Breaking News

भारताने स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.


ओडिशा : भारताने सोमवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. सबसोनिक निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची ही सहावी चाचणी होती. 2013 साली पहिल्यांदा निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. निर्भय क्षेपणास्त्राच्या सुरुवातीच्या काही चाचण्या अपयशी ठरल्या होत्या.