Breaking News

टीव्ही मालिका कलाकार तपासणीच्या कचाट्यात


कराड / प्रतिनिधी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी सुरु आहे. या तपासणीतून कोणीही सुटत नाही हे विशेष. सोमवारी महामार्गावर अशाच प्रकारच्या तपासणीला ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील कलाकारांना सामोरे जावे लागले. महामार्गावर तपासणी पथकाने त्यांची चारचाकी अडवून संपूर्ण गाडीची कसून तपासणी केली. याप्रकाराने कलाकारांच्या भुवया मात्र उंचावल्या होत्या.