Breaking News

माझा लढा अन्याया विरोधात - गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर साठी इमेज परिणाम

विटा / प्रतिनिधी : माझा लढा अन्याय विरूध्दातील आहे, धनगर समाजाला आरक्षण मिळणे हा हक्काचा विषय आहे. धनदांडग्यांच्या पाठीशी नेतेमंडळी असेल पणे सामान्य जनतेचा पाठिंबा मला आहे, असे बहुजन वंचित आघाडीचे सांगली लोकसभा मतदार संघाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
खानापूर तालुक्यातील संपर्क दौर्‍यात चिखल होळ येथे ते बोलत होते. यावेळी सुहास पाटील, नागेवाडीचे युवक नेते संग्राम माने, प्रशांत माने, चिखल होळचे सरपंच विजय कसबे, सुनिल चव्हाण आदी उपस्थित होते. श्री. पडळकर म्हणाले, सध्याच्या खासदारांनी आपल्या वाईट वर्तुणुकीचे दर्शन घडविले आहे. दुसरे उमेदवार हे आपल्या आजोबांच्या वारसा हक्काच्या ताकदीवर आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी निवडणूक लढवित आहेत. माझ्या पाठीशी मतदारांचा उर्त्स्फुत प्रतिसाद असल्याने माझा विजय नक्की आहे.