Breaking News

संगमनेर शहरासह पठारभागात वादळी वाऱ्यासह पाऊस


संगमनेर/प्रतिनिधी: संगमनेर शहरासह तालुक्यातील पठारभागात काल शनिवारी दि. १३ रोजी राञी अचानक वादळी वाऱ्यासह पावसामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. संगमनेर शहरात तसेच सायखिंडी, राजापूर, गुंजावाडी, चंदनपुरी, समनापूर, वडगावपानं याठिकाणी काल संध्याकाळी साडे सहा ते सातच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. यावेळी जागोजागी मोठमोठे झाडे उन्मळूनपडलेली बघायला मिळाली. त्याचबरोबर पठारभागातील मांडवे बु, शिंदोडी येथे घरांचे पत्रे उडून गेले. मांडवे बु येथील काही घरांवरील पञे उडून घराची भिंत कोसळल्याने तीन चार जण जखमीझाले आहेत. चक्रीवादळाने परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसान भरपाईची मागणी येथील नुकसान ग्रस्त कुटुंबांनी केली आहे.

काल शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. याआधीच राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. शनिवारी सायंकाळी सात नंतर अचानक वातावरण बदललेआणि काळे ढग दाटून आले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घालायला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम मांडवे बु , शिंदोडी या दोन गावांना झाला.मांडवे बु येथे शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आदिवासी भिल वस्ती येथे अचानक वादळी वाऱ्याने हाहाकार घातल्याने येथील पवार कुटुंबाचे राहत्या घराचे पञे उडून गेले आणि घराची भिंतकोसळून घर भुईसपाट झाले. रात्री अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाल्याने झोपेत असलेल्या पवार कुटुंबियांच्या घराचे पञे उडून जाऊन घराची भिंतच आतल्या बाजूला ढासळली. यात बाळूभानुदास पवार , विमल बाळू पवार, झुंबरबाई भानुदास पवार, अजित श्रावण पवार, करण बाळू पवार हे जखमी झाले. त्यांना तात्काळ खाजगी दवाखान्यात दाखल करून उपचार करण्यात आले. ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे यांनी घटनास्थळी पाहणी करून शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.