Breaking News

कॅथोलिक शाळेत डॉ.आंबेडकरांना अभिवादन


टिळकनगर/प्रतिनिधी: राहता तालुक्यातील टिळकनगर येथील कॅथोलिक मराठी शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे संचालक फादर मायकल वाघमारे व मुख्याध्यापक पी. एस. निकम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निकम यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केले. व आंबेडकर जयंतीनिमित्त समता पंधरवाड्यात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास मुख्याध्यापक पी.एस. निकम, अगाथा सूर्यवंशी, शामल साळवे, विणा बोधक, छाया निकाळे, वैशाली बनसोडे, भारती शिनगारे, शिक्षक सुनील उबाळे उपस्थित होते.