Breaking News

तर ही वेळ राज ठाकरे यांच्यावर आली नसती : विनोद तावडे

विनोद तावडे साठी इमेज परिणाम

मुंबई : जे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लुख्खा या भाषेत हिणवले त्याच काँग्रेसला आणि निरुपम यांना मतदान करण्याची वेळ आज मनसेच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. हा खरंच मनसेच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार आहे, अशी खरमरीत टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावर केली.
राज ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुध्द केलेल्या टीकेला उत्तर देताना विनोद तावडे म्हणाले की, कालच्या मेळाव्यातील भाषणासाठी राज ठाकरे यांनी जसे कष्ट घेतले ते आधी घेतले असते तर आज दुसर्‍यासाठी सभा घेण्याची वेळ आली नसती. स्वतचे इंजिन आता बंद पडले ते सध्या दुस-याला लावून चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. राहुल गांधी यांना पंतप्रधान करा. मग देश चालेल तरी नाही तर खडड्यात तरी जाईल असे बोलणा-या राज ठाकरे यांच्यावर टीका करताना तावडे म्हणाले की, हा देश सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश आहे. हा काही खेळ नाही. खडड्यात जायला काय मनसे पक्ष आहे असा उपरोधिक सवालही त्यांना केला. तसेच राहुल गांधी पंतप्रधान चालेल का हे आधी शरद पवार यांना विचारुन घ्यावे, नाहीतर पुढील तुमच्या स्क्रिप्ट बंद होतील असा टोलाही तावडे यांनी मारला. शरद पवार, भुजबळ, अजित पवार यांच्या विरुध्द राज ठाकरे आधी काय बोलले हे आठवून बघा, असे सांगताना तावडे म्हणाले की, भारतामध्ये लोकशाही नसती व मानवी हक्काची जपणूक नसती तर युनायटेड नेशन्स हयुमन राईटस कौन्सिलच्या टॉप मोस्ट बॉडीवर सुमारे 193 देशांपैकी 188 देशांनी भारताला पाठिंबा देऊन निवडून दिले असते मग जगातील सर्व देश मुर्ख आहेत आणि तुमचेच खर आहे का अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन चालणार्‍यांनी हा नको म्हणून त्याला दुसर्‍याला द्या असे म्हणणे बरोबर नाही. तसेच राज ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यात जी भाषा वापरली ती भाषा मराठी माणसाला आवडत नाही. त्यांचे असे बोलणे निवडणूक आचार संहितेमध्ये बसत नाही असेही तावडे यांनी सांगितले.