Breaking News

फलटणमध्ये जयंती उत्साहात


कोळकी / प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 वी जयंती फलटणमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मान्यवरांनी आणि समाज बांधवांनी फलटण मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच विविध ठिकाणी आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी आपल्या सदभावना प्रकट केल्या.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी राहुल निंबाळकर , नंदकुमार नाळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच फलटण नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंग नाईक निंबाळकर भाजपा तालुका अध्यक्ष सुशांत निंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .फलटण येथील सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने त्यांच्या कार्यालयात क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.