Breaking News

‘भाजपाने जनतेची फसवणूक केली’- पाटीलकराड / प्रतिनिधी -  गत लोकसभा निवडणुकीमध्ये अच्छे दिनच्या नावाखाली सवंग लोकप्रियतेसाठी खोट्या घोषणा करून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेची घोर निराशा केली असून यापुढील काळात त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
ते राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या इंदोली ता.कराड विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

याप्रसंगी कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, पै.संजय थोरात, भास्करराव गोरे, संभाजीराव सरकाळे, संजय कदम, सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.सुरेखा जाधव, जयवंतराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जयवंतराव साळुुंखे, प्रशांत निकम यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सिकंदर मुल्ला यांनी सुत्रसंचालन केले व नरेंद्र साळुंखे यांनी आभार मानले. मेळाव्यास चिमणराव कदम, प्रकाश चव्हाण, जयसिंग चव्हाण, निखिल साळुंखे, बाबुराव माने, शहाजीराव चव्हाण, प्रताप चव्हाण, राजेंद्र भोसले, हणमंतराव जाधव, प्रकाश पुजारी, संदिप काटे, खंडेराव देशमुख, शंकरराव यादव यांचेसह इंदोली, पाल, कोर्टी, पेरले, वडगांव उंब्रज, हिंगनोळे, चोरे, चोरजवाडी, वाजेवाडी, भगतवाडी, मरळी, भांबे, भूयाचीवाडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.