Breaking News

खा. लोखंडेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल; विनापरवानगी सभा घेतल्यामुळे कारवाईसंगमनेर/प्रतिनिधी
आचारसंहितेच्या काळात विनापरवानगी सभा घेतल्यामुळे  शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात घारगाव पोलिस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहेअकोले विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या संगमनेर तालुक्यातील अकलापुर येथे गुरुवारी सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला


यावेळी तेथे सभा घेण्यातआलीया सभेत लोखंडे यांनी कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर टीकादेखील केलीयावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होतेदरम्यान या सभेसंबधीचे मेसेज व्हॉटस्अपवरुन कार्यकर्त्यांनादेण्यात आले होतेयाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यत पोहोचली.त्यामुळे त्यांनी या सभेचे चित्रीकरण करण्याचे आदेश आपल्या पथकाला दिले होतेसभेची कोणतीच परवानगी त्यांच्याकडून घेतली गेली नव्हती

तसेच पोलिसांकडून अशी कोणतीही परवानगी नसल्याची माहिती मिळताच संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्याचा आदेश सहाय्यकनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी  रात्री उशिराने दिलेत्यानंतर रात्री उशिरापर्यत घारगाव (संगमनेरपोलिस ठाण्यात भरारी पथकातील अधिकारी पीएनवाकचौरे यांच्या तक्रारीवरुन कोणतीही परवानगी  घेताजनसमुदाय जमवून सभा घेऊन आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.