Breaking News

पारनेर तालुक्यात वादळी वार्‍यासह गारपीट


टाकळी ढोकेश्‍वर/प्रतिनिधी: पारनेर तालुक्यातील पारनेर विरोली कान्हुर पठार भाळवणी टाकळी ढोकेश्‍वर परिसरात रात्री 8 वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वार्‍यासह मोठया प्रमाणात गारपीट झाली. दिवसभर आभाळ ढगानी आच्छादलेले होते. वातावरणात जबरदस्त उष्णता जाणवत होती. मात्र, रात्री 8 वाजेच्या दरम्यान अचानक जोरदार वादळी वारे आणी गारपीटीला सुरवात झाली. विरोली कान्हूर पठार परिसरात गारपीटीमुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. नगर कल्याण महामार्ग लगत टाकळी ढोकेश्‍वर येथील चारा छावणीवर जनावरासह शेतकर्‍यांचे हाल झाले. आभाळ ढगांनी आच्छादलेले असल्याने जोरदार पावसाची शक्यता आहे.