Breaking News

दत्तनगरमध्ये उद्या भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा


टिळकनगर/प्रतिनिधी : श्रीरामपुर तालुक्यातील दत्तनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमशक्ती व एकता समितीच्यावतीने उद्या गुरुवार 18 एप्रिल रोजी डॉ. बागले हॉस्पिटल समोरील प्रागणात सायंकाळी 7 वाजता भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा होणार असल्याची माहीती भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिली. 

कार्यक्रमास नगराध्यशा अनुराधा आदिक, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, पंचायत समिती सभापती दीपक पठारे, मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, नगरसेवक राजेंद्र पवार, युवक अध्यक्ष योगेश जाधव, खादी ग्रामोद्योगचे प्रवीण फरगडे, रिपाईचे सुभाष दादा त्रिभुवन, नगरसेवक प्रकाश ढोकणे, विलासराव ठोंबरे, नाना शिंदे, माजी उपसरपंच संजय जगताप, सरपंच रवी अण्णा गायकवाड, पी.एस. निकम. एमआयडीसीचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, सागर भागवत, रिपाईचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मगर, पत्रकार लालमोहम्मद जहागीरदार, कामगार नेते अशोक बोरगे, टिळकनगर पतपेढीचे चेअरमन बाळासाहेब विघे, ग्रा.प. सदस्य अशोक लोंढे, किरण खंडागळेंसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.