Breaking News

आजपासून कोळपेवाडीचा महेश्वर यात्रोत्सव


 कोपरगाव ता./प्रतिनिधी
 कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी असलेली कोळपेवाडी येथील महेश्वर यात्रोत्सव  चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर आजपासून सुरु  होत आहेया निमित्ताने  महेश्वर यात्रा उत्सव कमिटी  महेश्वरफेस्टिवलच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा उत्सव कमिटीकडून देण्यात आली.  अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून शासनाकडे महेश्वर  देवस्थानची दखल घेण्यात आली असून महेश्वर देवस्थान हे पुरातन आहे.हे पंचक्रोशीतील एक जागृत देवस्थान असून गुढीपाडवा सण  यात्रा म्हणजे गावातील  परिसरातील भाविकांना एक पर्वणीच असतेनवसालापावणारे देवस्थान असल्याने परिसरातील अबालवृद्ध येथे मनोभावे नतमस्तक होतातशिर्डी - सुरत राज्य मार्गाच्या जवळच हे देवस्थान असून शेजारी मोठेबाबा देवस्थान ,मुस्लिम पंच कमिटीचे मज्जिद ,उत्तर दिशेलाअसणाऱ्या गोदावरी मातेचे वास्तव्य यामुळे हा परिसर पावन झाला आहे.  हा उत्सव गुढीपाडव्यानंतर पाच ते सात दिवस सुरू राहतो.   यात्रोत्सवादरम्यान याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त राहणार असून परिसरावर  सीसीटीव्ही कॅमेऱ्याची  नजर असणार  आहे.