Breaking News

श्रीरामपूरमध्ये पेन्शनर्स मेळावा पट्टाश्रीरामपूर/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना, श्रीरामपूर यांच्या वतीने पेन्शनधारकांचा मेळावा दि १२ एप्रिल शुक्रवार रोजी कामगार सदन येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास निवृत्त कर्मचारीसमन्वय समिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी दिली.

इपीएस ९५ सेवानिवृत्त पेन्शनधारकांना पेन्शनमध्ये वाढ करावी यासाठी उच्च न्यायालय केरळ येथे पिटीशन दाखल करण्यात आले होते. त्या मध्ये पेन्शनधारकांना पेन्शनमध्ये वाढीसाठीआदेश दिला होता. त्या आदेशविरोधात भविष्य निर्वाह निधी दिल्ली कार्यालयाने सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आव्हान दिले होते. ते सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले.केरळ न्यायालयानेपेन्शनवाढसाठी दिलेला निर्णय कायम ठेवला.त्याची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना, श्रीरामपूर यांच्या वतीने पेन्शनधारकांचा मेळावा दि १२ एप्रिल शुक्रवार रोजी कामगारसदन येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास निवृत्त कर्मचारी समन्वय समिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनीदिली.