Breaking News

वडूज मध्ये गारांचा पाऊस तर परिसरात रिमझिम


वडूज / प्रतिनिधी : कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणार्‍या खटाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने आज सोमवारी सायंकाळ पासून अवकाळी गारांचा पाऊसास वडूज मध्ये सुरुवात झाली सह काही परिसरात रिमझिम हजेरी लावली.

या झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. मुळात खटाव तालुक्यातील काही तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. आज झालेल्या पावसाने जनावरांच्या चार्‍यासाठी थोडे फार हिरवळ तयार होण्यास मदत होईल. आज दुपार पासून ढगाळ वातावरण निर्माण व विजेचा कडकडाट सुरू झाला झाला होता. तर सायंकाळी सहा च्या दरम्यान पावसाची संततधार सुरू झाली. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा अनुभव तालुकावासीयांना येत आहे. तर विहीरी व बोअर यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. मात्र आज शहर व पसिरातही कमी -अधिक प्रमाणात पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरुच होता. तर रस्त्यांवर गारांचा सडा पडला होता. जोरदार वार्‍याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर ऐन एप्रिल महिन्यात उकड्यात पडलेल्या पावसाच्या सरी मुळे वातावरणात थोडासा गारवा न
...