Breaking News

मोदींच्या घरावर छापा टाकणार का ? एमके स्टॉलिन यांचा आयकर विभागाला सवालचेन्नई : काही दिवसांपूर्वी डीएमके पक्षाच्या काही नेत्यांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. एमके स्टॉलिन यांनी कोईम्बतूरमधील प्रचार सभेमध्य बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करत म्हणाले की, आयकर विभाग सांगत आहेत की संपूर्ण माहिती मिळवल्यानंतर दुमई मुरगन यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी कोरोडो रूपये असतील, असे मी सांगितले. तर तुम्ही त्यांच्या घरावर छापा टाकणार का? असा सवाल एमके स्टॉलिन यांनी शुक्रवारी केला.

लोकसभा निवडणूक 2019 च्या लढाईला सुरूवात झाली आहे. प्रचारस सुरूवात झाली आहे, तर त्यामुळे स्थानिक-राज्यस्तरावर पक्षांमध्ये वार- पसटवार हे चालूच आहेत. निवडणुकीची रणधुमारी चांगलीच रंगली आहे. यामध्येच तामिळनाडूमधील द्रविड मुनेत्रा काझगम पक्षाचे प्रमुख एमके स्टॉलिन यांनी आयकर विभागाला एक आव्हान दिले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, आयकर विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी छापे घालावेत. मोदींवर निशाणा साधत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. असा प्रश्‍न त्यांनी आयकर विभागाला केला आहे. एमके स्टॉलिन पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांचा मुलगापण यंदाच्या निवडणुकीमध्ये उभा राहतो आहे. तर त्याकडूनही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात असेल. तर त्यावर सुद्धा आयकर विभागाने छापा घालावा, असा प्रश्‍न उपस्थित केला. यापूर्वी ही कर्नाटकमध्ये अनेक नेत्यांच्या घरावर छापे घालण्यात आली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमापस्वामी जवळचे लघु सिंचन मंत्री सीएम पुट्टाराजू आणि त्यांचे एक संबंधित घरावर आयकर विभागाने छापे मारले होते.