Breaking News

लोकसेवा आयोग परीक्षेत विरकरवाडीच्या विक्रम विरकरचे यश

म्हसवड / प्रतिनिधी : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून(युपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा अंतिम परीक्षेत म्हसवड(विरकरवाडी) येथील विक्रम जगन्नाथ विरकर यांनी बाजी मारली असुन देशात 347 वा रँक मिळवून आयएएस तथा सनदी अधिका-यांच्या रांगेत स्थान मिळविले.

विक्रम विरकर यांनी यापुर्वीही 2015 मध्ये याच परीक्षेत 812 रँक वर प्रथम यश संपादन केले होते. त्यानंतर 2016 मधील परीक्षेत 784 रँक मिळवून दुस-यांदा यश संपादन करुन पणजी ( गोवा) येथे आयकर आयुक्त पदावर कार्यरत झाले.
या पदावर सध्या कार्यरत असतानाच त्यांनी पुन्हा आपले नशीब आजमावण्यास यंदाची लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व चढत्या क्रमांकाने म्हणजेच 347 वी रँक काबीज केली.व सनदी अधिकारी पदावर नियुक्त होण्यास पात्र ठरले. या परीक्षेस दहा 69 हजार 556 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती.चार लाख 93 हजार 972 विद्यार्थ्यांनी पुर्व परीक्षा दिली यामधील 1994 विद्यार्थ्यांच्या मुलाखती गेल्या महिन्यात झाल्या होत्या.