Breaking News

वारकरी संप्रदायाचा वारसा सांभाळण्याची गरज-आदिनाथ महाराज शास्त्री


शेवगाव/प्रतिनिधी : संत महंत वेदांचार्य नारायण महाराजांनी वारकरी संप्रदायाचा चालविलेला वारसा भविष्यात समाजाने श्रद्धा, विश्‍वासाने सर्वांनी भविष्यात एकत्रपणे सांभाळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महंत आदिनाथ महाराज शास्त्री तारखेश्‍वरगडकर यांनी व्यक्त केले. 

तारखेश्‍वर गडाचे महंत नारायण महाराजांनी प्रारंभ केलेल्या 41 व्या फिरत्या नारळी सप्ताह वाडगाव थाटे ता.शेवगाव येथे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला होता. त्याची सांगता महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हरी कीर्तानाने झाली. 

यावेळी महंत शास्त्री म्हणाले की, गोपालकाला हा देवाने एकट्याने नव्हे तर सर्वांनी एकत्रपणे भक्तिभावाने साजरा करून वारकरी सांप्रदायाचा वारसा जोपासण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याच्या उपदेश दिला. अत्यंत भयावह दुष्काळी परिस्थिती असताना वाडगाव ग्रामस्थांनी हा सप्ताह भव्य दिव्य वातावरणात पार पडला
या सप्ताहात हभप विठल महाराज गोरे, हभप रामगिरी महाराज येळी, हभप पुंडलिक महाराज गहिनीनाथगड, मृदुंगाचार्य खंडू महाराज सानप, भारत पठाडे महाराज, जिपच्या अध्यक्षा शालिनी विखे, माजी आ.चंद्रशेखर घुले, काकासाहेब नरवडे, जिप सदस्य हर्षदा काकडे, जय भगवान महासंचाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, केदारेश्‍वराचे तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, उद्योजक भिमराव फुंदे, भाजपाचे अमोल गर्जे, भाऊसाहेब मुंडे, गणेश ढाकणे उपस्थित होते.