Breaking News

आत्मा मालिक ध्यानपीठात चैत्र महोत्सव


कोपरगाव/श.प्रतिनिधी: सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या मार्गदर्शनाखाली विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट च्या वतीने १६ ते १८ एप्रिल दरम्यान चैत्र महोत्सव व आत्मानुष्ठानाचे आयोजन करण्यात आलेआहे. या उत्सवासाठी आत्मा मालिक ध्यान पिठाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. अशी माहिती आत्मा मालिक ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी रविवारी आयोजितपत्रकार परिषदेत दिली.

चैत्र महोत्सवाच्या कालावधीत सकाळी साडेपाच वाजता योग व प्राणायाम ने सुरुवात होऊन भजन, आरती,मौनध्यान ,अभंगवाणी असे कार्यक्रम पार पडणार आहेत. १६ एप्रिल रोजी सायंकाळीसुप्रसिद्ध गायिका पूर्वा क्षीरसागर व भाग्यश्री क्षीरसागर यांची अभंगवाणी असणार आहे.तसेच आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचा अध्यात्मिक संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रम होईल. तर १८एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक पंडित शंकरराव वैरागकर यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम होईल, १८एप्रिल रोजी दुपारी ज्या भाविकांनी महाशिवरात्री पासून उपवास केलेले आहे त्यांचा आत्मानुष्ठाणाचाविधी पार पडणार आहे.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 'आत्मा मालिक ध्यानयोग विद्या संस्थान' या नवीन वस्तूचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. अशी माहिती संत परमानंद महाराज यांनी दिली. यावेळी ध्यानयोग मिशनचे संत सदस्य परमनंद महाराज,संत निजानंद महाराज, संत विवेकानंद महाराज ,संत जितेंद्रानंद महाराज आदी उपस्थित होते.