Breaking News

सामाजिक ठिकाणांसह प्रशासकिय कार्यालयात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात


श्रीगोंदे/ प्रतिनिधी: शहरातील विविध भागांत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती प्रतिमा पूजन करून, उपस्थित समाज बांधवांना शुभेच्छा संदेश देत साजरी करण्यात आली. इंदिरा नगर येथे तरुणांच्या पुढाकाराने बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करीत,म हमानवांच्या जीवनचरित्राचा उल्लेख करीत सर्व समाजाला समतेचा आणि संदेश देण्यात आला आहे.याठिकाणी टिळक भोस, विजय गायकवाड ,अमित हरिहर,संजय सावंत,सचिन झगडे ,राजेंद्र पोकळे,सुनिल छातीसे ,राहुल शिंदे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

याच बरोबर सिद्धार्थनगर येथील स्मारकात जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुण साजरे केले.या कार्यक्रमात भव्य मंच बनवून त्यात महापुरुषांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या.

यावेळी श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी उपस्थित समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन गौतम घोडके, हृदय घोडके, दिपक घोडके, भारत घोडके, संग्राम घोडके, धरम घोडके, भगवान घोडके, लक्ष्मण घोडके आदींनी केले होते.

प्रशासकीय कार्यालयातही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त श्रीगोंद्यातील प्रसशासकीय कार्यालयात प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यात श्रीगोंदे बस आगारात व्यवस्थापक प्रवीण शिंदे, कार्यशाळा अधीक्षक प्रशांत होले, वाहतुक निरीक्षक शिंदे, चालक शिंदे, शिपाई रमेश धाडगे वाहक चोबे, मेकॅनिक आबा ससाणे आदींसह श्रीगोंदे आगारातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयात जयंतीचे औचित्य साधून रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी सतिष ओहोळ (सचिव) भारतीय बौद्ध महासभा,लक्ष्मण काशीनाथ घोडके,संग्राम घोडके,डॉ.राजुळे,राजेश मिश्रा,सुधाकर घोडके,धरम घोडके,भगवान घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

श्रीगोंदे पोलिस स्टेशनमध्ये पी.आय.दौलतराव जाधव यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. यावेळी पो.कॉ. अविनाश ढेरे, पो.स.इगावित, महिला कर्मचारी उपस्थित होते.वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आर एफ ओ अश्विनी दिघे यांच्या हस्ते बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी,वनपाल रवी तुपे,वनपाल प्रवीण अवचर,सह कर्मचारी उपस्थित होते.