Breaking News

राकेश कुमार हरियाणा स्टिलर्सच्या प्रशिक्षकपदी

राकेश कुमार साठी इमेज परिणाम

मुंबई : भारताचा अनुभवी कबड्डीपटू राकेश कुमार आगामी हंगामात हरियाणाच्या संघाला प्रशिक्षण देणार आहे. रामबीरसिंह खोकर यांच्याजागी राकेश कुमार हरियाणाच्या खेळाडूंना मार्गदर्शन देणार आहे. प्रो-कबड्डीत राकेश कुमारने यू मुम्बा, पाटणा पायरेट्स संघाचं नेतृत्व केलं आहे. यानंतर त्याने कबड्डीमधून निवृत्ती स्विकारली. सहाव्या हंगामात राकेश समालोचकाच्या भूमिकेतही दिसला होता. सातव्या हंगामात नवीन जबाबदारीबद्दल बोलत असताना अनुप म्हणाला, पुन्हा एकदा प्रो-कबड्डीच्या मैदानावर उतरायला मिळतंय याचा मला आनंद आहे. या हंगामात हरियाणाच्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल. या संधीबाबत मी व्यवस्थापनाचे आभार मानतो. राकेशच्या अनुभवाचा संघाला नक्की फायदा होईल, याचसोबत खेळाडूंमध्ये विजयाची नवीन आशा निर्माण करण्याचं काम राकेश कुमार करेल असा आत्मविश्‍वास हरियाणाच्या संघ व्यवस्थापनाने बोलून दाखवला.