Breaking News

रॅलीद्वारे शक्ती जोतीस मानवंदना


कोळगाव/प्रतिनिधी
बहादुरगड धर्मवीरगड शक्तीज्योत शौर्ययात्रा निमित्ताने छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानच्या  स्मरणार्थ  व्यसनमुक्ती संघटना यांचे वतीने बहादुरगड पेडगाव येथे शक्तीज्योत शौर्ययात्रा आयोजितकेली होती.यावेळी शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनने श्रीगोंदे  ते पेडगाव धर्मवीर गड अशी मोटार सायकल रॅली काढून शक्ती ज्योत शौर्य यात्रेस मानवंदना दिलीयावेळी श्रीगोंदे तालुक्यातील तहसीलदार महेंद्र माळीफौजदार  दौलतराव जाधवगटविकास अधिकारी काळे यांच्या हस्ते स्मृतीस्तंभाचे  ज्योतीचे पूजन करण्यात आलेयावेळी श्रीगोंदे तालुक्यातील सर्व हुतात्मा जवानांचे प्रतिमा पूजन केले.

 संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण म्हणून  छत्रपती संभाजी राजे यांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी बहादुरगड ते तुळापूर अशी शक्तीज्योत आयोजित केली जातेया ज्योतीचे शासकीय पूजन आज श्रीगोंदातालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी केले