Breaking News

गोदावरी उजवा कालवा रुंदीकरणासाठी बोरावके उद्योग समुहाची देणगीराहाता/प्रतिनिधी
गोदावरी उजवा तट कालवा रुंदीकरण कामासाठी बोरावके उद्योग समुहाचे प्रमुख नानासाहेब रावबहाद्दूर बोरावके यांनी 1 लाख रुपये देणगी कालवा समितीचे सदस्य यांच्याकडे दिली आहे.

गोदावरी उजवा तट कालवा रुंदीकरण व खोलीकरणाचे कामास सुरुवात झाली असून या कामासाठी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी व संस्थेने निधी देवून यात लोकसहभाग घ्यावा. असे आवाहन कालवा समितीच्यावतीने करण्यात येत आहे. बोरावके उद्योग समुहाचे प्रमुख नानासाहेब बोरावके यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश या कामासाठी दिला. त्यावेळी गोदावरी कालवा समितीचे अध्यक्ष राजेंद्र बावके, रावसाहेब गाढवे, दिपक बोरावके, राजेंद्र कार्ले यांच्यासह सदस्य उपस्थित होते. याकामासाठी विविध संस्थांनी देणगी रुपात निधी दिला आहे. नाम फौंडेशन, टाटा फौंडेशन, श्री श्री रवीशंकर या संस्थेच्यावतीने याकामासाठी यंत्रसामुग्री देणार असून त्यासाठी लागणारा डिझेल खर्च 4 ते 5 कोटी आहे. या डिझेल खर्चासाठी जास्तीत जास्त निधी शेतकर्‍यांनी व नागरीकांनी द्यावा. अशी मागणी समितीच्यावतीने करण्यात आली आहे.