Breaking News

'काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे !


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. पण त्यानंतर झालेल्या राजकीय चर्चेनंतर प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर भडकले आहेत.

'काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीवेळी ते असा गाढवपणा करणार हे मला माहिती होते. निवडणुकीत भेटी-गाठी होतात. पण त्याचं राजकारण करणं काँग्रेसला जमतं,' असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.