Breaking News

वांगदरीचा यात्रोत्सव होणार साधेपणानेश्रीगोंदे / प्रतिनिधी - तालुक्यातील वांगदरी येथील १० व ११ एप्रिल रोजी होणारा अंबिका मातेचा यात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. वांगदरीचेभूमिपुत्र राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या निधनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

वांगदरी येथील अंबिका मातेचा यात्रोत्सव नगर व पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या यात्रोत्सवसाठी तालुक्यासह जिल्ह्याबाहेरून लोक येतात. येथे होणारे मनोरंजनाचे कार्यक्रम आणि कुस्त्यांचाहगामा देखील प्रसिध्द आहेत. येथे कुस्त्यांच्या हगाम्यांसाठी राज्यभरातून प्रसिद्ध मल्ल येतात. तसेच यात्रेनिमित्त मांसाहारी जेवणाचे देखील गावात मोठमोठे कार्यक्रम होतात. मात्र वांगदरीचेभुमीपुत्र, माजी आमदार तथा राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांचे १९ सप्टेंबर २०१८ रोजी निधन झाले. या दुःखद घटनेमुळे यावर्षी यात्रोत्सव साधेपणाने साजराकरण्याचा निर्णय पाडव्यादिवशी ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे यावर्षी वांगदरी येथील अंबिका मातेच्या यात्रोत्सवनिमित्त मनोरंजनाचे कार्यक्रम अथवा कुस्त्यांचा हंगामा होणारनाही, केवळ देवीची विधिवत पूजा, छबिना होणार आहे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव मदने, माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठलराव नागवडे, दगडू सोनलकर, उपसरपंच महेशनागवडे, पोलीस पाटील सुभाष गोरे, श्रीमंत मासाळ, शिवाजी चोरमले आदी उपस्थित होते.