Breaking News

अवैध दारु वाहतूकप्रकरणी चौघे ताब्यात


गोंदवले / प्रतिनिधी : म्हसवड-कारखेल रस्त्यावर हवालदारवाडी गावाच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई करीत सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल म्हसवड पोलिसांनी जप्त केला. या वाहनातील चारजणांना ताब्यात घेतले. निवडणुकीच्या कालावधीत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे दारूची अवैध वाहतूक कारणार्‍यांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.

याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसवड -कारखेल रस्त्यावर इंझबाव गावाच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक करणार्‍या वाहनांची माहिती मिळाल्यानंतर सातारा जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि मालोजीराव देशमुख, पो. नाईक पी. बी. बोराटे, कॉन्सटेबल पी. एस. जाधव, आर एस मदने, एम डी धुमाळ, के एल चव्हाण, इरफान मुजावर, महिला कॉन्सटेबल रेश्मा सावंत, एस पी बागल यांनी या रस्त्यावर सापळा रचून पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ गाडीसह चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या गाडीतील 59 हजार 204 रुपये किंमतीच्या टंगो पंच या कंपनीच्या लेबल असलेल्या 180 मिलीच्या 1152 बाटल्या, प्रत्येकी 52 रुपये किंमत, 5200 रुपये किंमतीच्या 90 मिलीच्या बाटल्यांचे 2 बॉक्स (दोनशे बाटल्या), 10800 रुपये किंमत असलेल्या डॉ ब्रँडी लेबल असलेल्या 90 मिलीच्या 96 बाटल्या 18720 किंमतीच्या ऑफिसर चॉईस लेबल असलेल्या बातळ्यांचे 3 बॉक्स, तर 5 लाख 95 हजार किंमतीची पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ गाडी असा सुमारे 6 लाख 88 हजार 904 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

या वाहनात असणार्‍या ज्ञानोबा तुकाराम पिसे, वय 38, भारत तुकाराम गोरड, वय 28, दादा बापू हुलगे, वय 29 व मामा भानुदास हुलगे, वय 45 सर्व रा. गोरडवाडी ता. माळशिरस, जि. सोलापूर या चौघांवर कारवाई करीत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

सदरची कारवाई शनिवार 13 एप्रिल च्या रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी केली असून सदर घटनेची फिर्याद कॉन्स्टेबल नीतीन धुमाळ यांनी केली असून तपास स पो नि मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पी. बी. सोरटे हे करीत आहेत.