Breaking News

ईव्हीएम, व्हिव्हिपॅट यंत्रणा पडताळणी करुन सज्ज


सातारा / प्रतिनिधी : 262 - सातारा विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम, व्हिव्हिपॅट यंत्रणा निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतिमरित्या पडताळणी करुन 45 सातारा लोकसभा निवडणुकीच्या मतदनासाठी सज्ज करण्यात आली आहेत.

ईव्हीएम, व्हिव्हिपॅट अंतिमरित्या सज्ज करण्याच्या प्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार रोहिणी आखाडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक निरीक्ष सुरेंद्र झा यांनी ईव्हीएम, व्हिव्हिपॅटच मशिन कसे हाताळावे याविषयी उपस्थित कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले, यावेळी ते म्हणाले, ईव्हीएम, व्हिव्हिपॅटचे मशिन वाहतूक करताना व मतदनाच्या दिवशी हाताळताना अत्यंत काळजी घ्यावी, तसेच भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक-2019 साठी पहिल्यांदाच ईव्हीएम मशिनसोबत व्हिव्हिपॅट मशिनचा वापर करणार आहे.