Breaking News

पोलिस नाईक संजय बडे आर.पी.एल परीक्षेत प्रथम


शेवगाव/प्रतिनिधी : शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक संजय जनार्दन बडे हे केंद्र सरकारची पतंजली आयोगा मार्फत आर.पी.एल ही परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यांना 400 पैकी 316 गुण मिळाले आहेत. 14 फेब्रुवारी 2019 ला ही परीक्षा अहमदनगर येथे सैनिकी स्कूलमध्ये ऑनलाईन घेण्यात आली होती. पोलिस नाईक संजय बडे यांना परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्र व मार्कशीट केंद्र सरकारकडून प्रदान करण्यात आले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय योग शिक्षक म्हणून मान्यता मिळाली आहे. या त्यांच्या यशाबद्दल शेवगाव-पाथर्डी पोलिस स्टेशनचे अधिकारी व सर्व कर्मचारी पत्रकार संघातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.