Breaking News

जाचक निर्बंधातून महाबळेश्र्वरवासियांची सुटका करू


सातारा/ प्रतिनिधी : पर्यावरण टिकलं पाहिजेच पण माणूसही जगला पाहिजे. माणूसच जगू शकत नसेल तर बाकीच्याचा उपयोग काय? जाचक निर्बंधातून उभ्या राहिलेल्या प्रश्र्नांच्या सोडवणूकीसाठी महाबळेश्र्वर-पाचगणीकरांसाठी सर्वात पुढे मी असेन, अशी ग्वाही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.
भिलार (ता. महाबळेश्र्वर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांचे सातारा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार श्री. छ.उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ झालेल्या प्रमुख पदाधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते.

पाच वर्ष्यापुर्वी मनकी बातच्या माध्यमातून जनतेच्या मनात घर करणार्‍यांचा खरा चेहरा आता उघड होऊ लागला आहे प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख रु आणि तरुणांच्या हाताला काम देऊ असे सांगत 2 कोटी नोकर्‍या देणार्‍यांच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडण्याची वेळ आता आली आहे. जातीयवादयाचा खरा चेहरा आता उघड होऊ लागला आहे, अशी टिकाही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली.
केंद्रातील सरकारने देशात एकप्रकारे अविश्र्वा साचे वातावरण निर्माण केले आहे. ते नाहीसं करण्यासाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या विचारांचे सरकार यावे लागेल. उद्योगांत मंदी आहे, जीएसटीमुळे सर्वच व्यावसायिक अडचणीत आले. उद्योगांची वाताहत आहे. व्यावसायिक-शेतकरी-व्यापारी हा वर्ग भरडला जातोय. त्यामुळे एकट्या उदयनराजेंना निवडून देऊन चालणार नाही, तर केंद्रातील सत्ता उलथून टाकण्यासाठी संपूर्ण देशात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. देशात आज परिवर्तनाची गरज आहे. मतदारांचा एक निर्णय चुकला तर तो दुरूस्त करण्यासाठी पाच वर्षे वाट पहावी लागते. त्यामुळे सावध होऊन निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहेफफ, असेही उदयनराजेंनी सांगितले. आपल्या देशावर दिवाळखोरी लादली जात आहे. केवळ लोकसभाच नव्हे तर येत्या पाच महिन्यांत विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचीच सत्ता स्थापन होणार आहे. एकदा चुकलेला निर्णय पाच वर्षे दुरुस्त करता येणार नाही. त्यामुळे येणार्‍या निवडणूकीकडे एक चळवळ म्हणून पाहिले पाहिजे. तरच हे अकार्यक्षम, थापेबाज, अन्यायकारक सरकार सत्तेपासून बाजूला जाईलफफ असे आवाहनही श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब भिलारे, विकास शिंदे, बाजार समिती उपसभापती संजय मोरे, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भिलारे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किसनशेठ भिलारे प्रमुख उपस्थित होते. बाळासाहेब भिलारे म्हणाले, विरोधी उमेदवार राष्ट्रवादीतुन भाजपमध्ये आणि काही दिवसातच तिकीटासाठी शिवसेनेत गेला. माथाडींच्या नावाखाली सर्वसामान्यांना भुलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आमदार मकरंदआबांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी-भिलार-महाबळेश्र्वर येथील कार्यकर्ते उदयनराजेंसाठी जिवाचे रान करतील. भविष्याचा वेध घेऊन सत्ताधा-यांना येणा-या निवडणूकीत नाकारण्याचा निर्णय आता जनतेनेच घेतला आहे. याप्रसंगी संजय गायकवाड यांचेही भाषण झाले. मधूसागरचे चेअरमन संजय गायकवाड, प्रवीण भिलारे, आनंद भिलारे, राजूशेठ राजपुरे, विजय भिलारे, गणपत पार्टे, सुभाष कारंडे तसेच भिलार पंचक्रोशीतील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.