Breaking News

गीता परिवारातर्फे ‘संस्कार वाटिका’ शिबीरसंगमनेर/प्रतिनिधी

गीता परिवाराच्या वतीने दहा दिवसांचे ‘संस्कार वाटिका’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १६ एप्रिलपासून याची सुरवात होणार आहे. या शिबिराचा विद्यार्थ्यांनी मोठ्यासंख्येने लाभ घ्यावा असे आवाहन गीता परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

सुटी म्हणजे टाईमपास नव्हे तर अभ्यासाच्या पुस्तकांव्यतिरिक्त बरेच काही शिकण्यासाठी मिळालेला अवधी असून शरीर, मन, बुद्धी, वाणी यांना आकार देणार्‍या अनेक गोष्टी आत्मसातकरायला मिळालेली संधी म्हणजे सुटी असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात गीता परिवार तीन दशके यशस्वी झाला आहे. भगवद गीतेतील जीवनमुल्यांची प्रतिष्ठापना बालमनातकरण्यासाठी पारंपरिक संसाधनांच्या सोबतच लघुपट, महानाट्य, योगसोपान, प्रज्ञासंवर्धन अशा विविध माध्यमातून आणि बालभवन सारख्या नियमित उपक्रमातून गीता परिवाराची संस्कारसाधना अखंडीत सुरु आहे.

येत्या दि. १६ ते २५ एप्रिल या कालखंडात ‘संस्कार सुगंध’ हा अभ्यासक्रम मुलांना शिकविला जाणार आहे. यासह अनेक कृतीशील उपक्रम, खेळ, सामान्यज्ञान, कथाकथन, गीतगान अशा विविधउपक्रमातून हे संस्कार धन मुलांना वाटले जाणार आहे.

संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहुरी, श्रीरामपूर, येवला, शेवगाव आणि सिन्नर इत्यादी तालुक्यातील एकंदर ४६ केंद्रांवर हे शिबीर संपन्न होणार आहे. यंदाच्यावर्षी डिसेंबरमध्ये गीतापरिवाराच्यावतीने ‘विराट गीता महोत्सव’ आयोजित केला जाणार आहे. विविध राज्यातील गीता परिवाराच्या सुमारे तिस हजार मुलांचे एकत्रिकरण संगमनेरात हा दिव्य सोहळा करण्याचासंकल्प करण्यात आला आहे. या विराट संमेलनात योगसोपान भाग - २ द्वारे योगासनांची संगितमय प्रात्यक्षिके सादर केली जातील.अशीही माहिती गीता परिवाराच्या वतीने देण्यात आली.