Breaking News

संपतराव देशमुख दूध संघांच्या प्रगतीत कष्टकर्‍यांचे योगदान - अपर्णाताई देशमुख


कडेगाव / प्रतिनिधी : संपतराव देशमुख दूध संघाची स्थापना होवून वीस वर्ष होत आहेत. या संघाच्या भरभराटीत कष्टकरी दुग्ध उत्पादक, दुध सोसायटी व या ठिकाणचे कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन ग्रीन पॉंवर्स शुगर्सच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख यांनी केले.

संपतराव देशमुख दुध संघाच्या स्थापनेस वीस वर्ष पुर्ण झाली. यानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन तानाजीराव जाधव होते. कार्यक्रमास यावेळी, दुध संघाचे व्हा. चेअरमन श्री. राजकुमार निकम, संचालक श्री. शेखर मोरे, चंद्रकांत पाटील, दिपक मोहिते, संदेश दंडवते, तसेच संघाचे कार्यकारी संचालक व सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अपर्णाताई देशमुख म्हणाल्या, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संपतराव देशमुख दूध.संघाची उभारणी संग्रामसिंह देशमुख यांनी सुरुवात केली. केवळ दुध जमा करणे व पाठवणे एवढेच काम काही दिवस केले आता मात्र दुध संघ डोंगराई नावाच्या ब्रँडच्या नावाने दूध, श्रीखंड, लस्सी,पनीर व इतर सर्व प्रकारच्या उपपदार्थ निमिँती करून पश्र्चिम महाराष्ट्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे. तानाजी जाधव म्हणाले, संघाचे कर्मचारी कामसू आहेत. भविष्यात आपण आदर्श काम करून संघाच्या भरभराटित योगदान दयावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले.