Breaking News

के.बी.पी.पाॅलीटेक्निकच्या ४३ विद्यार्थ्यांची 'कमिन्स'मध्ये निवड


कोपरगाव/प्रतिनिधी: संजीवनी के.बी.पी.पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने आयोजीत करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कमिन्स इंडिया लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनीच्या ४३ विध्यार्थ्यांची नोकऱ्यांसाठी निवड केली. संजीवनीने ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना नोकऱ्या देवुन मोठी उपलब्धी साधली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे, संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांनी ग्रामिण विध्यार्थाना नोकऱ्या मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.

यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. गिरीश वट्टमवार व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. साहेबराव दवंगे उपस्थित होते.