Breaking News

ग्रामीण भागाची प्रगती होणे गरजेचे - बाबासाहेब कल्याणी


रहिमतपूर / प्रतिनिधी : गावात राहणार्‍या कुटुंबाचं उत्पन्न तीन वर्षात दुप्पट व्हावे. प्रत्येकाची आर्थिक प्रगती झाली तर गावाची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्र्वास भारत फोर्सचे चेअरमन बाबासाहेब कल्याणी यांनी व्यक्त केला.

भारत फोर्स कंपनीच्या सीएसआर फंडातून रहिमतपूर परिसरातील बारा गावांमध्ये विकासकामे सुरु आहेत. कामाच्या पाहणीसाठी बाबासाहेब कल्याणी, सौ. सुनिताताई कल्याणी यांनी न्हावी, नागझरी, बोरगाव येथे भेट दिली. धामणेर, ता. कोरेगाव येथील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मेजर जनरल विजय पवार, अरुण पवार, सौ लिना देशपांडे, जयदिप लाड आदी उपास्थित होते .
बाबासाहेब पुढे म्हणाले, भारत फोर्सच्या व्हिलेज इम्प्रव्हमेंट प्रोगॉम अंतर्गत महाराष्ट्रातील शंभर गावात ग्रामविकासाचे स्वप्न घेऊन काम करीत आहोत. आपणाला पुढे जायचंय हा गावाचा विचार असायला पाहिजे. गावाची प्रगती करायचीय ही मानसिकता तयार झाली पाहिजे. ग्रामीण भागाची प्रगती होणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले.

पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते व स्वच्छता या पंचसुत्रीवर भारत फोर्स काम करीत असून सर्वांनी उत्साहाने यात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केलं. प्रास्ताविक शहाजी क्षीरसागर यांनी तर आभार अशोकराव देसाई यांनी मानले.