Breaking News

मुख्यमंत्री नागपूरचे असतांना शहर विकासाच्या बाबतीत पिछाडीवर नाना पटोले यांची टीका

नागपूर : केंद्रीयमंत्री आणि मुख्यमंत्री नागपूर शहरातून असताना देखील हे शहर विकासाच्या, आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत प्रचंड मागे पडले आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोलेंनी यांनी गडकरी आणि फडणवीस यांच्यावर केली आहे. नागपूर लोकसभा मतदार संघात एका-मागे एक अनेक जाहीर सभा घेत गडकरींच्या चौफेर विकासावर त्यांनी टीका केली आहे. नाना पटोले यांची प्रतिक्रियालोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत. नाना पटोले गडकरींवर शाब्दिक हल्ले करत आहेत. नितीन गडकरींच्या विकासाच्या मॉडेलवर चौफेर टीका करताना पटोले म्हणाले, नागपूर शहराच्या विकासाच्या नावावर जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला जात आहे. भाजपच्या सरकारवर कोणीही खूष नाही. एवढे काय तर देवी-देवता देखील त्यांच्यावर नाराज आहेत. नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असताना देखील स्वच्छतेच्या यादीत 58व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. नागपूर काँग्रेसच्या काळात 10 व्या क्रमांकावर होते. शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहे. गडकरीसह भाजपचे नेते खोटे बोलण्यात पुढे आहेत. संविधानाला धोका निर्माण आहे, असे आरोपही नाना पटोले यांनी केले.