Breaking News

दहिवडी येथील महायुतीच्या सभेला शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची दांडी


दहिवडी / प्रतिनिधी : दहिवडी येथे महायुतीच्या उमेदवार रणजितसिंह ना निंबाळकर यांच्या प्रचारात महसूलमंत्री मा चंद्रकांत दादा पाटील यांची जाहीर सभा झाली यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते मात्र या सभेला माण तालुका शिवसेना पदाधिकारी व इतर नेते मात्र दिसले नाहीत.

माण खटाव मधील दोन दशके शिवसेनेची जबाबदारी सांभाळणारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांच्यासह तालुकाप्रमुख, उपतालुखा प्रमुख, विभागप्रमुख यांची गैरहजेरी प्रामुख्याने दिसून आली. यावेळी हा विषय मात्र चर्चेचा विषय ठरला यामागील गौडबंगाल काय की भाजपा विश्र्वासात घेत नाही काय असे अनेक प्रश्र्न सभास्थानी उपस्थित झाले.