Breaking News

'वॉटर कप' साठी एकवटले ग्रामस्थ


पारनेर/प्रतिनिधी: सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेला 8 एप्रिल पासून सुरुवात झाली. महाराष्ट्रातून अनेक गावांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. पारनेर तालुक्यातील 68 गावांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला असूनजवळपास तीसहून जास्त गावांचे या स्पर्धेमध्ये श्रमदान व मशिनच्या साह्याने कामे सुरू आहेत तालुक्यातील वडनेर हवेली येथे पहिल्या दिवसापासून चांगल्या प्रकारचे श्रमदानाचे आणिमशीनचे काम सुरू केले आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी गावच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ उठवुन पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम एकजुटीने राबवण्याचाग्रामस्थांनी निर्णय घेतला व या स्पर्धेत महाराष्ट्रात बाजी मारण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे.

वॉटर कप स्पर्धा सुरू होण्या आधीपासून वडनेर हवेलीत स्पर्धेची पूर्वतयारी केली होती . स्पर्धा सुरू होताच मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी श्रमदानाला गावकऱ्यांनी सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत ग्रामस्थ महिला तरुण लहान मुले आबालवृद्ध अशे जवळपास दीडशे जण श्रमदान करतात गावातील लोक स्वतःहून श्रमदानासाठी पुढे येत आहेत . त्यामुळे गावामध्येचांगले वातावरण निर्माण झाले आहे. सी.सी.टी, डीप.सी.सी.टी, मोठा नाला बांध, छोटा नाला बांध, आदी काम मशिनच्या साह्याने सुरू आहेत ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून त्यांचा खर्च भागवलाजात आहे अनेक ठिकाणाहून लोक स्वतःहून लोकवर्गणी जमा करण्यासाठी पुढे येत आहे.