Breaking News

जिजाऊ ब्रिगेडची नगर तालुका कार्यकारणी जाहिर


अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या न्याय, हक्कासाठी कार्यरत असलेल्या जिजाऊ ब्रिगेडची नगर तालुका कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली. तपोवन रोड येथे झालेल्या संघटनेच्या बैठकित जिल्हाध्यक्षा अनिता काळे यांनी नवीन पदाधिकार्‍यांची घोषणा करुन निवड झालेल्या महिलांना फेटे बांधून नियुक्ती पत्र देत सत्कार करण्यात आला.

यामध्ये नगर तालुकाध्यक्षपदी संचिता गुंजाळ, तालुका उपाध्यक्षपदी सुषमा गुंजाळ, सचिवपदी सीमाताई ढोकणे, संघटकपदी सुनिता आमटे, कोषाध्यक्ष सुनिता झाडे, सह कोषाध्यक्षपदी स्वाती पठाडे, प्रसिध्दी प्रमुखपदी मिनाक्षी मुनफण यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सारिका खांदवे, आशाताई गायकवाड आदिंसह पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.

बैठकिच्या प्रारंभी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सामाजिक कार्यात सक्रीय असणार्या महिलांना संघटनेच्या विविध पदावर संधी देण्यात आली स्पष्ट करीत अनिता काळे म्हणाल्या की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिजाऊ ब्रिगेड प्रयत्नशील आहे. महिलांनी महिलांसाठी उभे केलेले हे प्रभावी संघटन असून, संघटनात्मक रित्या महिलांचे प्रश्‍न महिलाच सोडवू शकणार आहेत. महिला उद्योजक पुढे येण्यासाठी संघटनेच्या वतीने मार्गदर्शन शिबीर घेण्यात येणार असून, घरगुती व्यवसाय चालविण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम चालू आहे. महिलांना बँकेच्या कामकाजाची माहिती मिळावी म्हणून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, लवकरच संघटनेचा राष्ट्रव्यापी अधिवेशन घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.