Breaking News

स्त्री कर्तृत्वाचा सन्मान पत्रकार प्रियंका धारवाले यांना राज्यस्तरीय चौथास्तंभ पत्रकारिता पुरस्कार प्रदान
समीर शेख
जामखेड ता.प्रतिनीधी -  जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा येथील प्रिंयका धारवाले यांना 2017 18 या दोन वर्षांमध्ये गाव माझा केबल नेटवर्क टीव्हीच्या माध्यमातून प्रियंका धारवाले यांनी सामाजिक क्षेत्रातील विदारकता व संपन्नता हे दोन्ही प्रकारचे वास्तव बातम्याद्वारे मांडले व मराठा समाजाचे मोर्चे दरम्यान संयमाने ,तटस्थपणे केलेले कव्हरेज ,स्पेशल स्टोरीजमधुन समाजातील इतर घडामोडींचा सूक्ष्मपणेवेध घेउन सामाजिक समस्यांचे सतत निराकरण हे कार्य लक्षात घेता दिलासा जनविकास प्रतिष्ठान आद्यक्षा डॉ. अनघा पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय चौथास्तंभ पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार वितरण सोहळा मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी औरंगाबाद येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.अप्रतिम फाउंडेशनच्या वतीने सन २०१० पासून पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात काम करणाऱ्या पत्रकारांना यांना राज्यस्तरीय चौथास्तंभ पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. स्मृतिचिन्ह , सन्मानपत्र , सत्कार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी रामकृष्ण मिशन मंदिरचे विश्वस्त विष्णुपादनंदजी, माजी महसूल आयुक्त कृष्णा भोगे, जेष्ठ उद्योजक राम भोगले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत , जेष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अनघा पाटील, वैशाली खाडीलकर, डॉ. अनिल फळे प्रीतम फळे ,प्रियंका धारवालेसह धारवाले परिवार, आदि मान्यवर उपस्थित होते.Attachments area