Breaking News

उद्योग प्रकल्प जिल्ह्यात तीन वर्षात आणणार;शैलेंद्र वीर : बिभवी, रिटकवली व भणंग गावांना भेटीसातारा / प्रतिनिधी : शेतकर्‍यांच्या हिताबद्दल जागरुक असलेला प्रश्नांची सोडवणूक करण्याची इच्छाशक्ती वव ध्येय बाळगून लढत देत आहे. जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच कायमच्या नोकर्‍या मिळाव्यात यासाठी मोठमोठे उद्योग प्रकल्प कमीत कमी तीन वर्षात आणणार, अशी ग्वाही देशभक्त किसन वीर उर्फ आबासाहेब वीर यांचे नातू व सातारा लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार शैलेंद्र रमाकांत वीर यांनी दिली.
शैलेंद्र वीर सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी थेट गावोगावी भेटी देवून निवडणूकीचा प्रचारावर भर दिला आहे. या प्रचारात वीर त्यांचा जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यंानी नुकतीच मेढा भागातील बिभवी, रिटकवली व भणंग अशा अनेक गावांना भेटी दिल्या. या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

भणंग, मोरावळे ते बिभवी अशा जवळपास सहा ते सात गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनींवर बोजा चढवण्यात आला आहे. हा बोजा शेतकर्‍यांच्या जमिनींवर लादला आहे आणि मूळ रकमेच्यावर व्याज लावत हा बोजा एकरी जवळपास लाख रुपयांच्या घरात गेला आहे.

अशा प्रकारे पाण्यासाठी जो शेतकर्‍यांचा हक्क आहे, त्या हक्काशी हा कर्जाचा बोजा शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे. हा एक प्रकारे अन्यायच हे शेतकरी सहन करत आहेत, अशी भावना वीर यांनी व्यक्त केली.
या शेतकर्‍यांचा जमिनीशी संबंधित प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी मी कसून पाठपुरावा करेल, असे वीर यांनी आश्वासन दिले. दरम्यान, वीर यांच्यासोबत प्रचारासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची त्यांना मोठी साथ मिळत आहे.