Breaking News

सोनाईत गारांचा पाऊस


सोनई/प्रतिनिधी : सोनई येथे काल दुपारच्या वेळेला अचानक गारांचा पाऊस पडला. यावेळी शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली. पाऊस पडल्यानंतर उन्हाचा तडाखा सुरू झाला. वंजारवाडी, प्रशांत नगर, पानासवाडी, शनिशिंगणापूर, शिरेगाव, खेडलेपरमानद आदी भागात काही ठिकाणी गारा पडल्या. काही काळ गारवा निर्माण झाला.दरम्यान मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण पावसामुळे थांबले गेले.दिवसभर ऊन, आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

राहुरी रोडवरील वंजारवाडीत गारांचा पाऊस झाल्याने ठिक ठिकाणी नागरिकांनी, भाविकांनी गारांचा पाऊस पाहण्यासाठी आनंद घेतला.