Breaking News

यशवंत वाचनालयात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन


सोनई/प्रतिनिधी : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यशवंत वाचनालयात जेष्ठ साहित्यिक विजय नांगरे व डॉ.कार्तिकी नांगरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.

वाचनालयाचे जेष्ठ संचालक डॉ. देविदास ससाणे व घावटे यांनी मनोगत व्यक्त केले. विजय नांगरे व डॉ. कार्तिकी नांगरे यांनी साहित्य प्रवासाचा लेखाजोखा मांडला. सर्व साहित्यिकांनी एकञ येऊन या डिजिटल युगात पुस्तक वाचनासाठी प्रबोधन केले पाहिजे असे अवाहन केले. जेष्ठ साहित्यिक यशवंतरावजी गडाख यांच्या साहित्यनगरीचे पत्रकार विजय खंडागळे यांनी कौतुक केले. याप्रसंगी घावटे, अशोक कुलकर्णी, चंद्रभान एळवंडे, एन.के. गडाख, बबन साळवे, बाळासाहेब तेलोरे, निकम, गिरवाले, जयराम आगळे व वाचक वृंद उपस्थित होते.