Breaking News

‘गारीगार’चे उद्घाटन संजय नवगिरे यांच्या हस्ते


शेवगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील थाटे येथे ‘गारीगार’ मराठी शॉर्ट फिल्मचे उद्घाटन रामनाथ महाराज शास्त्री व रेडू फिल्मचे लेखक संजय नवगिरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी संजय नवगिरे म्हणाले की, कलाकार हा छोट्यातून यातून मोठा होत असतो. मी पण एक छोटा कलाकार होतो. गरीब कुटुंबातला छोटा कलाकार मी छोटी कामे करून मला आज दादासाहेब फाळके पुरस्कार भेटला. या चित्रपटासाठी माझे चित्रपटाचे सर्व उत्कृष्ट लिखाण झाले. त्यांनी गारीगार मराठी शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक व लेखक किरण सुधाकर गायकवाड राहणार वाडगाव ता. शेवगाव व कलाकार बालकलाकार करण बळीद, प्रतीक शिरसाट, आईच्या भूमिकेत निशा जाधव, वडिलांची भूमिका सर्जेराव कसबे, रिपोर्टर अक्षय केदार, काकासाहेब चंदने, दादासाहेब खर्चन, पिंटू उफळे सर्व व टीमला लेखक संजय नवगिरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच पावन गणपती संस्थेचे रामनाथ महाराज शास्त्री यांनी संजय नवगिरे यांचा सत्कार करून व गारीगार मराठी शॉर्ट फिल्म दिग्दर्शक व लेखक व कलाकार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शॉर्ट फिल्म यांच्या टीमच्यावतीने रामनाथ महाराज शास्त्री यांचा सत्कार किरण सुधाकर गायकवाड व अक्षय केदार यांनी केला.