Breaking News

जनतेनं भाजपासह नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवावेकॉम्रेड सयाजीराव पाटील यांचे उंब्रज येथील पत्रकार परिषदेत आवाहन
उंब्रज / प्रतिनिधी- महात्मा गांधींच्या जन्मभूमीत जन्मलेल्या नरेंद्र मोदींच्या पदवीचा पत्ता नाही, जनतेशी कायम खोटे बोलून महात्मा गांधींच्या विचाराला हरताळ फासणार्‍या अशा व्यक्तीला आणि त्याच्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवा. सभ्य आणि सुशिक्षित माणसाची अशी वागणूक नसते. सगळ्या मंत्र्यांना व कॅबिनेटला विश्र्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागतो उदाहरण म्हणजे नोटबंदी, रात्री 8वाजता जाहीर केली हे अशिक्षित आणि आडमुठ्या पणाचे लक्षण आहे. अशी प्रवृत्ती सभ्य आणि सुसंस्कृत माणसाचे लक्षण नाही, स्वताःचे चरित्र हे आदर्शवत असले पाहिजे. ज्या मोदींची कुटुंबासोबत राहत नाही समाजाने यांच्या पासून काय आदर्श घ्यायचा बेटी बचाव बेटी बचाव ही योजना कोणत्या नैतिकतेच्या जीवावर मोदी राबवायला निघाले आहेत. जनतेला तुच्छ समजणार्‍या भाजपला आणि नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवा असा घणाघात कॉम्रेड सयाजीराव पाटील यांनी उंब्रज येथील पत्रकार परिषदेत केला.
गेल्या पाच वर्षातील मोदी सरकारचा अनागोंदी कारभार, हुकूमशाहीच्या बाजूने झुकलेली वाटचाल, शेतकरी, दलित, कामगार व अल्पसंख्यांक यांच्यावर होणारा अन्याय, भांडवलशाहीचे उदात्तीकरण, मोदी सरकारची खोटी आश्र्वासने ही राष्ट्रीय एकात्मतेला बांधा पोहचवणारी आहेत. देशाचे संविधान वाचवायचे असेल, लोकशाही वाचवायची असेल तर मोदी सरकार व भाजपाला सत्तेतून फेकून द्या असे मत डाव्या सरणीचे विचारवंत कॉंम्रेड सयाजीराव पाटील यांनी उंब्रज येथील पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत कॉंम्रेड सयाजीराव पाटील यांनी मोदी सरकार व भाजपावर हल्ला चढवला. मोदीचे सरकार अंत्यत खोटारडे व फसवे असून मोंदीनी घेतलेले निर्णय सभ्य माणसाचे लक्षण नाही. पंतप्रधानाची आदर्श वागणूक असली पाहिजे पंरतू प्रत्यक्षात तशी नाही. मागील पाच वर्षात मोदी सरकारने जनतेचा छळ केला असून सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाहीतली ही शेवटची निवडणूक असेल अशी टिका त्यांनी केली आहे.
भाजपा विषयी अथवा मोंदीबद्दल आमच्या मनात कटूता किंवा व्देष नाही पंरतू वास्तव भयानक आहे. निव्वळ निवडणूक यंत्रणा म्हणून लोकशाहीकडे बघता कामा नये. तर रक्ताचा थेंबही न सांडता समाज परिवर्तन करणे म्हणजे लोकशाही. म्हणून निव्वळ खोटे बोलुन सत्तेवर येणे समाजहितासाठी घातक आहे.
मोदी सरकारने शेतकर्‍यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करू, प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करू अशी कितीतरी खोटी आश्र्वासने देऊन देशातील जनतेची फसवणूक केली आहे. 8 नोव्हेंबर 2016 ला मोदी सरकारने नोटाबंदी सारखी तुघलकी घोषणा करून साडेचार कोटी लोकांचा रोजगार हिरावून घेतला आहे. तसेच लहानसहान उद्योगधंदे करणार्‍या लोकांना देशोधडीला लावण्याचे काम या सरकारने केले आहे.
या समाजात जातीयवादाचे विष पेरण्याचे, संविधानाची होळी करण्याचे तसेच सरकारी धोरणावर व सरकारला प्रश्र्न विचारणार्‍यांना देशद्रोही ठरविण्याचे धोरण या मोदी सरकारने राबवले आहे.
अशा अनेक कारणांमुळे मोदी सरकार व भाजपा पक्षाला 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून हद्दपार करण्याचा निश्र्चय आम्ही केला असल्याचे ते म्हणाले.