Breaking News

मनसेच्या श्रीगोंदे तालुकाध्यक्षपदी अमोल कोहक


श्रीगोंदे/प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या श्रीगोंदे तालुकाध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विचारांशी एकनिष्ठ काम करत असेलेले आणि सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असणारे ढोरजा येथील युवक अमोल कोहक यांची राज ठाकरे यांच्या सुचनेप्रमाणे अहमदनगर दक्षिणचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांनी अमोल कोहक यांची नियुक्ती केली. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शेळके धनराज कोथींबीरे, सतिष पाचपुते, विजय ढोले, प्रतिक घाटे, शुभम महामुनी, प्रविन अलभर, प्रविन होले, मनविसेचे तालुकाध्यक्ष अतुल कोठारे, शहराध्यक्ष सागर दिवटे आदी उपस्थीत होते.