Breaking News

मोदींनी भूखंडाची दिली चुकीची माहिती; काँग्रेसचा आरोप; कारवाईची निवडणूक आयोगाकडे मागणी



नवी दिल्लीः काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या निवडणूक अर्जात गुजरातच्या गांधीनगरमधील एका भूखंडाबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने याप्रकणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी असा दावा केला आहे, की मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी एक भूखंड घेतला होता आणि त्याबद्दल त्यांनी 2007 आणि 2012 च्या विधानसभा निवडणुकीत आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या अर्जात चुकीची माहिती देली आहे. काँग्रेसच्या या आरोपांवर सध्या भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. खेरा म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या संपत्तीबाबत काही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. त्याचे कारण त्यांनी याबाबत चुकीची माहिती दिली आहे.

मोदी मुख्यमंत्री बननल्यानंतर ही जमीन घेण्यात आली. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गांधीनगरच्या सेक्टर -1 मध्ये एक भूखंड असल्याचा उल्लेख आपल्या निवडणूक अर्जात केला, ज्याचे क्षेत्रफळ त्यांनी 326.22 मीटर असल्याचे नमूद केले होते. त्याची किंमत 1.3 लाख रुपये असल्याची माहिती मिळाली. बाजार भावानुसार त्याची किमंत आता 1.2 कोटी रुपये आहे, असा दावा करून खेरा म्हणाले, की 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भूखंड संख्या 411 चा उल्लेख आपल्या अर्जात केला नाही. त्यांनी दुसरा भूखंड 401/ए चा उल्लेख केला. त्याचे क्षेत्रफळ 326.22 वर्गमीटर सांगितले. त्यासोबत पंतप्रधानांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीतदेखील भुंखड 411 चा उल्लेख केला नाही, तर 401/ए चा उल्लेख केला. त्यांनतर त्यांनी आपल्या वेबसाइटवर आपल्या संपत्तीची घोषणा केली, त्यात 401/ए भुखंडाचा उल्लेख करताना म्हटले आहे, की ते याचे एक चतुर्थांश मालक आहेत.
मोदी यांच्या ताब्यात नेमका कोणता भूखंड आहे. त्याचे क्षेत्रफळ किती, त्याचे बाजारमूल्य किती आणि याबाबतची चौकशी करावी तसेच निवडणूक प्रतिज्ञापत्रासोबत चुकीची माहिती दिल्याप्रकरणी मोदी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी खेरा यांनी केली आहे.