Breaking News

कराड, पाटणला गारांसह पाऊस

Image result for गारांसह पाऊस

कराड / प्रतिनिधी : दोन दिवसांपूर्वीच कराडला झोडपून काढले होते. यानंतर आज दुपारी अवकाळी गारांसह पावसाने कराड, पाटण परिसरात हजेरी लावली. यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे.
मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मात्र दुपारी दीडनंतर अचानकपणे पावसाच्या हलक्या सरी झाल्या. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, आंबा आणि द्राक्षे या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उकाड्यामुळे हैराण झालेल्या लोकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकायला मिळत आहेत.